महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे प्रेयसीचे साक्षगंध झाले याची बातमी समजताच प्रियकराने त्याच्या प्रेयसीसह विषप्राशन केले आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर प्रेयसीवर देखील उपचार सुरू आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, कपिल बंदिश बावणे ( वय 25 ) असे मयत तरुणाचे नाव असून दोन दिवसांपूर्वी कळम तालुक्यातील मावळणी येथे ही घटना घडलेली आहे. कपिल बावणे याचे गावातील एका बावीस वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध जुळले होते. आठ दिवसांपूर्वी कपिलच्या प्रेयसीचे साक्षगंध झाले आणि त्यानंतर प्रेयसी आणि तो या दोघांनीही औषधी विषारी औषध प्राशन केले.
सदर घटनेची माहिती कपिल याने फोनवर आपल्या मित्राला दिली आणि मित्राने गांभीर्य ओळखत घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी ते दोघेही जमिनीवर पडलेले होते. दोघांनाही उपचारासाठी यवतमाळ येथे नेण्यात आले मात्र वाटेत कपिल याचा मृत्यू झाला तर त्याच्या प्रेयसीवर सध्या यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत .