खासदार नवनीत राणा चार दिवसांपासून मेळघाट येथे आदिवासी बांधवांसह धुळवड साजरी करत आहेत . तिथे त्यांनी लहान मुलांसोबत मजा करत असताना एक व्हिडिओ बनवला असून सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. त्यात त्यांनी पुष्पा चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग म्हणत ‘ नवनीत नाम सुनके लगा फ्लावर है क्या ? फ्लावर नाही फायर है ‘ असा डायलॉग मारला आहे. त्यांच्या या डायलॉगचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे.
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन याच्या डायलॉगबाजीचा फेवर सध्या देशभरात अनेक नागरिकांवर चढलेला आहे. त्यात आता नवनीत राणा यांनी देखील पुष्पाचा डायलॉग मारला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला असून त्यावर अनेक नागरिक आपले मत व्यक्त करत आहेत.