महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना चंद्रपूर इथे उघडकीस आली आहे. चंद्रपूरमध्ये एका तरुणाने भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर पोलिसांनी या विकृत तरुणाला अटक केली आहे. भर वस्तीत प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील वाहन शोरूम लगतच्या जागेत ही घटना घडली. प्रकाश डाफ असं या विकृत तरुणाचे नाव आहे. या विकृत तरुणाने रस्त्यावर असलेल्या एका कुत्रीला पकडले अन शोरूमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला . त्याचा हा सगळा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्यार फाउंडेशन प्राणीमित्र संघटनेला याची माहिती दिली. संघटनेने या प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी प्रकाश डाफ याला अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम 377 नुसार शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.