महाराष्ट्र हादरला..लग्नाला गेल्यावर दोन जण भेटले अन..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना वाशीम जिल्ह्यात उघडकीला आली असून अवघ्या 16 वर्षीय मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मंगळूरपीर पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात 21 तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळुरपीर तालुक्यातील पुंजाजी नगर येथे एका 35 वर्ष महिलेने आरोपी यांच्या विरोधात तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, ‘ तक्रारकर्त्या महिलेची 16 वर्षीय मुलगी 9 मार्च रोजी तपोवन येथे लग्नाला गेली होती. तिथे तिला आरोपी राष्ट्रपाल सरकटे आणि अनुप सावळे हा भेटला. या दोघांनी या अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला.

महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम 376 डी ए भा द वि आणि पॉक्सो कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे. एपीआय मंजुषा मोरे सदर प्रकरणी तपास करत असून आरोपींना कठोर शासन करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.


Spread the love