महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असून सदर व्यवसाय करणारे व्यक्ती देखील आता हायटेक झाले असून व्हाट्सअपवर आधी फोटो पाठवून दर ठरवला जातो आणि त्यानंतर पीडित मुलींना ठरलेल्या लोकेशनला पाठवले जाते असे दिसून येत आहे. अशीच एक घटना मुंबई येथील मिरा रोड इथे उघडकीला आली असून काशिमिरा पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जाळ्यात ओढण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकसोबत बनावट नोटांचा देखील आधार घेतला होता.
गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक रविराज कुऱ्हाडे, सहाय्यक निरीक्षक पुष्पराज सुर्वे यांच्या पथकाला सदर प्रकरणी गुप्त सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बोगस ग्राहकामार्फत शुक्रवारी व्हाट्सअपवर वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्या एका व्यक्तीशी संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने आठ तरुणींचे आधी फोटो पाठवले. त्यानंतर बोगस ग्राहकाने दोन तरुणींनी बाबत सौदा नक्की केला आणि एडवांस पेमेंट ऑनलाइन रक्कम देखील त्यांना अदा केली.
समोरच्या व्यक्तीने काशिमिरा येथील सूर्यप्रकाश लॉज इथे तरुणी पाठवत असल्याचे सांगितले. लॉजमध्ये दोन खोल्या बुक केल्यानंतर एका रिक्षातून तीन तरुणींना लॉजजवळ आणण्यात आले. त्यातील एक तरुणी रिक्षात थांबली तर इतर दोन बबलू नावाच्या एका दलालासोबत लॉजमध्ये गेलेल्या असताना पोलिसांनी बाहेर असलेल्या रिक्षाचालक भुलेश्वर कुमार गुप्ता ( वय 42 राहणार दहिसर ) याला ताब्यात घेतले तर लॉजमध्ये गेलेल्या बबलू याने बोगस ग्राहकाकडून पैसे घेताना त्याला देखील जेरबंद केले. पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आलेली आहे.