महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून वर्गमित्र असलेल्या युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्या मैत्रिणीची अश्लील चित्रफीत तयार केली आणि तिची बदनामी व्हावी म्हणून वर्गमित्राच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केली. सदर प्रकरणी युवतीने जळगाव जिल्ह्यातील खामगाव येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका युवकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार,खामगाव येथील शिवाजीनगर भागात राहणारी पीडित युवती ही वर्गमित्राच्या संपर्कात आली. अनेक वर्षांनंतर झालेली भेट आणि त्यातून दोघांमध्ये हळूहळू प्रेम फुलू लागले त्यानंतर प्रियकराने तिला पुरवार गल्ली येथील एका ठिकाणी बोलावले आणि आपल्या दुसर्या एका मित्राच्या मदतीने लपून तिची अश्लील चित्रफीत तयार केली. बावीस मार्च २०२२ पूर्वी ही चित्रफीत त्याने मित्राच्या माध्यमातून चक्क सोशल मीडियावर देखील टाकून दिली.
सदर प्रकार हा पीडित मुलीच्या घरच्यांना समजला त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर आरोपी युवक हा अत्यंत उच्चभ्रू कुटुंबातील असल्याने गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव आणण्यात आला होता मात्र अखेर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला . सदर प्रकरणात अश्लील चित्रफीत बनवण्यासाठी एका मित्राचा आधार घेण्यात आल्यामुळे प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे.