पुणे हादरलं..अल्पवयीन मुलीला शिक्षक छतावर घेऊन जायचा अन , आरोपीचे वय ऐकाल तर ..

Spread the love

महाराष्ट्रात कोरोना कमी झाला असला तरी अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे .पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना अवघ्या काही दिवसापूर्वी घडलेली असतानाच आणखी एक घटना पुणे इथे वानवडी परिसरात उघडकीस आली आहे .शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला असून संजय रमेश शर्मा (वय ५२) असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे .

उपलब्ध माहितीनुसार, नराधम आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलीसोबत हा घाणेरडा प्रकार करत होता. आरोपी शिक्षक खासगी शिकवणी घेत असून 15 वर्षीय पीडित मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आरोपी शिक्षकाकडे शिकवणीसाठी येत होती. 3 ऑगस्ट रोजी आरोपी शिक्षक पीडितेला इमारतीच्या छतावर घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला.

आपल्यासोबत झालेल्या या घटनेची मुलीने कुठे वाच्यता केली नाही म्हणून आरोपीची हिम्मत वाढली. 3 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबरपर्यंत जवळपास तीन महिने आरोपी शिक्षक पीडित मुलीचं छतावर नेऊन लैंगिक शोषण करत होता. आरोपी शिक्षकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं तिच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराची माहिती आपल्या आईला दिली आणि वानवडी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत


Spread the love