महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना नगर शहरात उघडकीला आली असून 28 तारखेला एका महिलेचा चक्क घरात घुसून विनयभंग करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार बंटी राऊत ( राहणार माणिक चौक अहमदनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असून सोमवारी दुपारच्या वेळी आरोपीने फिर्यादी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्याला अडवले असतात आरोपीने फिर्यादीचा हात धरून घरात ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन तिच्यासोबत केले.
फिर्यादी यांनी घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला आणि फिर्यादी पती आरोपीला जाब विचारण्यासाठी गेलेला असताना ‘ आरोपीने तू मला ओळखत नाही का ? मी बंटी दादा आहे तू इथून लगेच निघून जा. नाहीतर दोघांचे हात पाय तोडून टाकीन ‘, अशी धमकी दिली. पीडित परिवाराने त्यानंतर पोलिसात धाव घेतली.