तब्बल पाच महिने अत्याचार करून गर्भवती झाल्यावर म्हणाला की ?

Spread the love

महाराष्ट्रात एक एक धक्कादायक घटना समोर आलेली असून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर ती गर्भवती झाल्यावर तरुणाने लग्नाला नकार दिला त्यानंतर या तरुणीने पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात रविवारी तक्रार दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरात ही घटना उघडकीला आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार,अंकुश दिवाकर हजारे ( वय 18 राहणार कराड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या एका अल्पवयीन तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी करत तो तब्बल पाच महिने या तरुणीवर अत्याचार करत होता त्यानंतर ती गर्भवती झाली आणि त्यात चार महिने निघून गेले त्यानंतर तिने त्याला लग्नाची मागणी घातली असता त्याने लग्नासाठी नकार दिला.

सदर प्रकार मुलीच्या घरी समजल्यानंतर कुटुंबियांनी अल्पवयीन मुलीसह लाखांदूर पोलिसात धाव घेतली तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच कलम 376 अन्वये गुन्हा नोंदवला आहे गुन्हा दाखल झाल्याचे समजताच सदर तरुणी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


Spread the love