‘ एक मिनिटात घरी पाठवीन ‘ भाजप आमदाराची महावितरण अभियंत्याला धमकी

Spread the love

भाजपच्या आमदारांच्या दमदाटीचे अनेक कारनामे बाहेर येत असून अशाच एका घटनेत नोटीस न देता थकीत वीज बिलासाठी मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला फोनवर चक्क आई-बहिणीवरून शिव्या देण्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे.

या क्लिपमध्ये लोणीकर यांनी ‘ आमच्या नादाला लागू नका ‘ असे म्हणत त्याला आयकर विभागाची धाड टाकण्याची देखील धमकी दिली आहे. ‘ हिम्मत असेल तर तुम्ही झोपडपट्टीत जा तिथे आकडे टाकणार यांची वीज तोडा पण वेळेवर मी सर्व बिले भरलेली आहेत त्यामुळे माझा मीटर तुम्ही काढून का नेला ? ‘ असे विचारले त्याला दमदाटी करण्यात आलेली आहे. ‘ एका मिनिटात तुला सस्पेंड करून टाकेल ‘ असेही लोणीकर या क्लिपमध्ये म्हणतात.

औरंगाबादच्या सातारा परिसरातील महावितरणचे सहाय्यक अभियंता काळे यांच्याशी फोनवर आमदार लोणीकर यांनी संपर्क साधून मीटर काढून का नेले याबद्दल विचारणा केली. सदर ग्रुपमधील ऑडिओ हा बहुतांश शिवीगाळ करणाऱ्यातला असून लोणीकर यांनी या अभियंत्याला नोटीस न देता मीटर का काढून नेला अशी विचारणा केलेली आहे.

सातारा परिसरात लोणीकर यांचा बंगला आहे आणि त्याचे वीज बिल थकीत आहे. वसुलीसाठी लोणीकर यांच्या घरी अभियंत्याने चकरा मारल्या आणि मुलासोबत बोलणे झाले मात्र तरीही वीज बिल भरले नाही त्यानंतर अभियंत्याने मीटर काढून देण्याचा आरोप करत लोणीकर यांनी या अभियंत्याला शिवीगाळ केली.

अत्यंत खालच्या पातळीवर लोणीकर यांनी संवाद साधला असून अभियंता त्यांना वारंवार ‘ साहेब मीटर काढून दिलेला नाही ‘ असे म्हटल्यानंतर लोणीकर अभियंत्याला ‘ तुला अक्कल पाहिजे.. माज चढला का..एक मिनिटात घरी पाठवीन ‘ असे सुनावतात. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिलेली धमकी आणि वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल सोशल मीडिया तीव्र प्रतिक्रिया उमटत असून लोणीकर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

लोणीकर यांनी या प्रकरणावर बोलताना वीज वितरण कंपनीच्या आडून माझ्याविरूद्ध षडयंत्र रचले जात असून मी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावलेला नाही आणि माझा कुठलाही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेला नाही. माझा औरंगाबादमध्ये बंगला आहे मात्र त्या बंगल्यावरील मीटर काढून नेले नाही हा फक्त मला बदनाम करण्याचा कट आहे, असे म्हटलेले आहे .


Spread the love