सराईतच ‘ तो ‘, पण पोलिसांनीही आव्हान स्वीकारले अन मुलीची केली सुटका

Spread the love

गेल्या काही महिन्यांपूर्वी नंदुरबार तालुक्यातील न्याहलि इथून एका अल्पवयीन युवतीला पळवून नेणार्‍या गुजरात राज्यातील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी धुळे जिल्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या संशयित गुन्हेगार याच्याविरोधात गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात तब्बल चोवीस गुन्हे दाखल आहेत.

नोव्हेंबर २०२० मध्ये न्याहलि येथे 16 वर्षीय युवती आजोबांकडे राहण्यासाठी आली होती त्यानंतर 1 डिसेंबर 2020 रोजी सुरत येथील असलेला अक्षय शिंदे याने तिला पळवून नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र अक्षय आणि ती युवती यांचा तपास लागत नव्हता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडे सोपवला आणि पोलिसांनी देखील आरोपीला पकडण्यासाठी कंबर कसली .

अक्षय शिंदे हा सराईत गुन्हेगार असल्याने सातत्याने पोलिसांना चकवा देत हाती येत नव्हता मात्र गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना तो धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला मात्र अक्षय याने तिथूनही पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पथकाने त्याला शिताफीने अटक केली आणि युवतीची सुटका करत तिच्या कुटुंबाकडे तिला सोपवले आहे .


Spread the love