अखेर ‘ त्या ‘ दोघींची ओळख पटली , रेल्वेतून घेतली होती उडी

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना अकोला जिल्ह्यात समोर आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ नजीक मनारखेड रेल्वे गेटजवळ दोन अनोळखी तरुणींचे छिन्नविछिन्न झालेल्या अवस्थेत मृतदेह गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता आढळून आले होते अखेर त्या तरुणींची ओळख पटली असून त्या छत्तीसगड येथील रहिवासी आहेत. धावत्या रेल्वेमधून उडी घेतल्याने रेल्वेची धडक बसून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पूजा पुरुषोत्तम गिरी आणि बीबी सेवारत राजपूत ( वय 18 दोघी राहणार जिल्हा जहांगीर राज्य छत्तीसगड ) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघी एकमेकींच्या मावस बहिणी आहेत आणि आयटीआयला जातो असे म्हणत त्यांनी घर सोडले होते मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत अखेर कुटुंबीयांनी चापा पोलीस स्टेशन येथे त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

पूजा आणि बीबी या दोघींनी रेल्वेतून उडी पाठोपाठ उडी मारल्याचे समजते. त्यावेळी त्या आयटीआयच्या गणवेशात होत्या आयटीआयमध्ये त्यांचे कॉम्प्युटर ऑपरेटर असे शिक्षण सुरू होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडकर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी गाठले आणि पंचनामा करत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले त्यानंतर त्यांचा गणवेश आणि आणि इतर पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात यश आले.


Spread the love