मालमत्ताकर कमी करण्यासाठी सप्रेम भेट म्हणून ‘ व्हिस्कीचा खंबा ‘ घेतानाच..

Spread the love

महाराष्ट्रात घटना भ्रष्टाचाराची रोज नवीन प्रकरणे उघडकीला येत आहे अनेकदा याप्रकरणी नागरिकांकडून पैशाची मागणी केली जाते मात्र औरंगाबाद येथे एक अजबच प्रकार समोर आलेला असून मालमत्ता कर कमी करण्यासाठी घर मालकाकडून लाच म्हणून चक्क साडेतीन हजार रुपये आणि व्हिस्कीचा खंबा घेताना महापालिकेच्या एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. सदर कारवाई गुरुवारी सिडको परिसरात करण्यात आलेली असून प्रभू लक्ष्मण चव्हाण ( वय 52 ) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रहिवासी विठ्ठल गजानन दाभाडे यांचे संभाजी कॉलनी येथे घर आहे. त्यांना महापालिकेच्या वार्डकडून महापालिकेकडून मालमत्ता कराची नोटीस प्राप्त झाली होती हा कर कमी करावा यासाठी त्यांनी कनिष्ठ लिपिक असलेले प्रभू चव्हाण यांची भेट घेतली तेव्हा त्याने कर कमी करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.

दाभाडे यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष 30 मार्च रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली तेव्हा आरोपीने पाच हजार रुपये लाच मागितली असल्याचे समोर आले. त्यातील दीड हजार रुपये आरोपीने नगद घेतले होते आणि उर्वरित साडेतीन हजार रुपये आणि त्यासोबत दारूचा एक खंबा 31 मार्चला आणून द्या, असे सांगितले होते मात्र कारवाईच्या वेळेस त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.


Spread the love