‘ तो लहान मुलगा माझा नाही तर… ‘, पित्याला पोलिसांनी घेतले ताब्यात अन..

Spread the love

संसार म्हटलं की हे एकमेकांवर विश्वास हा हवाच मात्र अनेकदा किरकोळ गोष्टीतून गैरसमज वाढत गेला की त्यातून संशयाचे भूत जागे होते आणि ते काही लवकर जात नाही. नांदेड येथे एक अशीच घटना समोर आलेली असून पत्नीच्या अनैतिक संबंधातून मूल जन्माला आले आहे असा संशय त्याच्या मनात होता त्यामुळे त्याने चार वर्षीय मुलाला पोत्यात बांधून गोदावरी नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना कंधार येथे समोर आलेले आहे. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, माधवराव देव्हारे असे आरोपीचे नाव असून अभिषेक देव्हारे असे मयत मुलाचे नाव आहे. 28 मार्च रोजी अभिषेक शाळेतून घरी परत आला नाही म्हणून आई आणि तिच्या नातेवाईकांनी कंधार पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली होती. पोलीस चौकशी सुरू असताना महिलेचा पती माधव हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक पडवळ उपनिरीक्षक इंद्राळे यांनी या प्रकरणाचा तपास केला

आरोपी माधव देव्हारे याला दोन मुले आहेत. दारूच्या नशेत सातत्याने पत्नीसोबत भांडण करत असताना तो लहान मुलगा माझा नाही असे म्हणत असायचा. त्याच्या मनात ही गोष्ट इतकी पक्की बसली होती की त्यातून त्याने या मुलाला ठार मारण्याचा निर्णय घेतला. 28 तारखेला अभिषेक याला पोत्यात बांधून त्याने नायगाव तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीच्या पुलावरून फेकून दिले.

30 तारखेला अभिषेक याचा मृतदेह गोदावरी नदी काठावर तरंगताना पोलिसांना आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. आरोपी माधव देव्हारे याच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.


Spread the love