काय चाललंय ? महाराष्ट्रात चक्क पोलिसांवर फायटरने हल्ला

Spread the love

पोलीस म्हटल्यानंतर वर्दीचा आदर करावा हे एका चांगल्या नागरिकाचे लक्षण आहे मात्र अनेकदा हुल्लडबाजीतून तरुण कायदा हातात घेतात, असाच एक प्रकार बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथे समोर आलेला असून रात्रीच्या वेळी रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या तरुणांना समजावण्यात गेलेल्या पोलिसांना चक्क फायटरने मारहाण करण्यात आलेली आहे. सदर प्रकाराबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला जात असून धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर एक एप्रिल रोजी घडलेला आहे.

उत्तरेश्वर मधुकर केदार असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून शुक्रवारी रात्री ते टपाल घेऊन शासकीय दुचाकीवरून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे निघाले होते यावेळी कार्यालयासमोर दोन तरुण गोंधळ घालताना दिसले म्हणून केदार यांनी त्यांना हटकले त्यावेळी संतापलेल्या तरुणांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन जणांनी ‘ तू पोलीस असला म्हणजे काय झाले ? ‘ असे म्हणत केदार यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

केदार यांच्या मदतीला तिथे उपस्थित असलेले दुसरे पोलीस कर्मचारी आतकरे आणि राऊत हे धावून आले त्यावेळी तरुणांच्या मदतीसाठी कारमधून आणखी पाच जण काठ्या घेऊन आले आणि त्यांनी चक्क पोलिसांना मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांवर चक्क फायटरने हल्ला करण्यात आल्यामुळे सदर प्रकारावर प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

भररस्त्यावर सुरू असलेला हा गोंधळ पाहून इतरही नागरिक आणि कर्मचारी धावून आले. आपल्या विरोधात वातावरण होते आहे हे लक्षात येताच या हल्लेखोरांनी पलायन केले. दहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आनंत विश्वंभर मोरे, गणेश अंकुशराव मोरे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे तर प्रशांत बाळासाहेब मोरे, स्वरूप बाळासाहेब मोरे, अतुल बाळासाहेब मोरे आणि इतर अनोळखी पाच जण हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत .


Spread the love