महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना औरंगाबाद येथे समोर आली असून एका महिलेच्या फेसबुक अकाउंटवर पहाटे अश्लील फोटो पाठवून दुसऱ्याच दिवशी तिची माफी मागणाऱ्या एका आरोपीच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार संदीप बोरसे ( राहणार पिसादेवी अंजन डोहगाव ) असे आरोपीचे नाव आहे. उस्मानपुरा येथील चौसरनगर परिसरात पस्तीस वर्षे महिलेचे ब्युटी पार्लर आहे. तिच्या फेसबुक अकाउंटवर 27 मार्च रोजी पहाटे बोरसे याने अश्लील फोटो पाठवला त्यानंतर 28 मार्च रोजी दुपारी त्याने हा मेसेज पाठवत चुकून फोटो पोस्ट झाला असे सांगितले आणि महिलेची माफी देखील मागितली. महिलेने त्याला चांगलेच खडसावले मात्र महिन्याभरापूर्वी देखील त्याने असाच प्रकार केलेला असल्याने पीडित महिलेने अखेर पोलिसात धाव घेतली.