गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारात भर पडत असल्याचे दिसून येत आहे अशीच एक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून तळा तालुक्यात सत्तर वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीने अवघ्या सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. सदर अल्पवयीन मुलगी ही चार महिन्यांची गरोदर राहिल्याने या प्रकाराला वाचा फुटली.
उपलब्ध माहितीनुसार, तळा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय मुलगी संशयित आरोपी मारुती आंबेकर यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात होती त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत मारुती याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले त्यामुळे ती चार महिन्यांची गरोदर राहिली. आरोपी आंबेकर याने मुलीच्या आईला मुलीला उपचारासाठी घेऊन जातो असे सांगत आपला मुलगा रोहित आंबेकर याच्या मदतीने डोंबिवली येथील एका रुग्णालयात या मुलीचा गर्भपात देखील करून आणला.