गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना हातकणंगले इथे समोर आलेली असून येथील टिंबर व्यावसायिक दीपक हिरालाल पटेल ( वय 34 ) यांचा दहा दिवसांपासून अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही.
पंधरा लाख रुपये खंडणी मिळावी म्हणून त्यांचे शनिवारी 26 मार्च रोजी हातकणंगले येथून अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या भावाने दिली आहे. त्यांची मोटरसायकल पट्टणकोडोली इथे तर मोबाईल संकेश्वरजवळ एका बस मध्ये सापडलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत चाललेला असून कुटुंबीय हतबल झालेले आहेत. गुन्हे शाखा आणि हातकणंगले पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत असून अद्यापपर्यंत त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
हातकणंगले येथील टिंबर व्यवसायिक दिपक पटेल हे 26 मार्च रोजी गायब झाले होते दुसऱ्या दिवशी त्यांची मोटरसायकल पट्टणकोडोली येथे आढळून आली आणि त्यांचे मोबाईल लोकेशन कर्नाटक येथील होते त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. त्यांचा मोबाईल हा सोलापूर बेळगाव बसमध्ये सीटखाली ठेवलेला एका जोडप्यास आढळून आला त्या जोडप्याने मोबाईल चालू केला त्यावर दीपक यांच्या हैदराबाद येथील बहिणीने फोन केला.
दीपक यांची चौकशी केली तेव्हा हा मोबाईल आम्हाला सापडलेला आहे असे या जोडप्याने सांगितले त्यानंतर त्यांनी तो बस मधील महिला वाहकाकडे जमा केला. त्यांनी तो मोबाईल धारक नियंत्रकांकडे जमा केल्यानंतर पोलिस आता कॉल हिस्ट्री वरून तसेच इतर मार्गाने वेगवेगळी माहिती जुळवत प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.