महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथे समोर आलेली असून एका युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत तिला सातत्याने लग्नाचा तगादा लावण्यात आला. आरोपीच्या आईने देखील माझ्या मुलीशी लग्न न केल्यास दुसऱ्या कुणाशीही तुला लग्न करून देणार नाही, असा दम दिल्याची तक्रार पुलगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
अविनाश चरणदास घनमोडे हा एका युवतीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने माझ्याशी प्रेम कर आणि माझ्यासोबत बोलत जा, असे म्हणत होता. त्या युवतीने त्याला हटकले असता अविनाश याने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याची आई वनिता घनमोडे हिनेदेखील अश्लील बोलून माझ्या मुलाशी लग्न न केल्यास तुझे दुसरीकडे सुद्धा सुद्धा सुखाने लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. पीडित तरुणी या प्रकाराने घाबरून गेली आणि तिने पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली.