एक महिन्यावर लग्न असताना सुट्टीच्या दिवशी कंपनीच्या ऑफिसवर आला अन ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलेली असून अवघ्या दीड महिन्यांवर लग्न आलेले असताना एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महिंद्रा होम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात तो रोखपाल म्हणून ड्युटीवर होता त्या कार्यालयातच त्याने गळफास घेतला आणि रविवारी ही घटना उघडकीला आली.

उपलब्ध माहितीनुसार, कपिल वराते ( वय 28 राहणार चेकदरूर तालुका गोंडपिंपरी ) असे या तरुणाचे नाव आहे . कपिल हा गोंडपिंपरी कंपनीमध्ये रोखपाल म्हणून काम करायचा. त्याचे नुकतेच लग्न जुळले होते आणि 15 मे रोजी त्याचा लग्नसोहळा देखील होता. रविवारी तो एका लग्नसोहळ्यासाठी वरोरा येथे गेला तेथून परत आल्यानंतर कार्यालयाला सुट्टी असताना देखील त्यांनी कंपनीचे कार्यालय गाठले आणि तिथे गळफास घेत आत्महत्या केली.

सदर घटनेची माहिती कळताच अंमलदार जीवन राजगुरू यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी वराते याचा मोबाईल जप्त केला असून आत्महत्येचे कारण काय आहे हे अद्याप समोर आलेले नसल्याचे गोंडपिंपरी पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


Spread the love