गेल्या काही महिन्यांपासून मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. पूर्वी साधारण दहा हजाराच्या दरम्यान मिळणारे मोबाईल आता चक्क वीस हजाराच्या घरात जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे एखादा ठीकठाक मोबाईल घेणे हे देखील खर्चिक काम झालेले आहे त्यातून मोबाईल हरवला तर पुन्हा मोबाईल कसा घ्यायचा या चिंतेतून एकाच तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरनजीक समोर आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शंतनु अशोक भुयारी ( वय 17 राहणार पाचगाव तालुका उमरेड ) असे मयत मुलाचे नाव असून शंतनूने काही दिवसांपूर्वी खरेदी केलेला मोबाईल हरवला होता त्यामुळे तो तणावात असल्याची माहिती होती. त्याच तणावातून त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली सदर बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला उतरवून पाचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.
त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर त्याला नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि पोलिसांच्या बूथ सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे.