‘ बाई तुमच्या कथेवर विश्वास ठेवणे कठीण ‘, आरोपीला जामीन देत न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण

Spread the love

देशात अनेक वेळा खोट्या प्रकरणात देखील पुरुष व्यक्तींना महिलांकडून अडकवण्यात येते . महिलांचे नाव उघड होत नसल्याने असे प्रकार केले जातात अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली आहे . पीडितेने सांगितलेल्या कथेवर विश्वास ठेवणे अशक्य आहे तसेच पोलिसात तक्रार दाखल करण्यास दोन महिन्यांचा विलंब होत असल्याचे पाहून फिर्यादीची केस ‘संशयास्पद’ असल्याचे सांगत मुंबईतील अंधेरी येथील 26 वर्षीय तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण ?

अंधेरी येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा पेपर प्लेट बनवण्याचा छोटासा व्यवसाय आहे आणि तक्रारदार महिला त्याच्या वर्कशॉपमध्ये काम करत होती. तिने काम केलेल्या दिवसांसाठी जास्तीचे पैसे मागितले होते मात्र अर्जदाराने आधीच वेतन दिले असल्याचे सांगून तिला नकार दिला . त्यानंतर तिने मालकावर कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा बळजबरी) आणि कलम 376 (बलात्कार) अन्वये गुन्हा दाखल केला आणि पुढे प्रकरण न्यायालयात पोहचले.

न्यायालयाने यावर निरीक्षण नोंदवताना ,“ एफआयआर दाखल करण्यात झालेल्या विलंबासोबतच पीडितेने सांगितलेल्या कथेवर विश्वास ठेवणे अशक्य आहे. ही घटना रात्री 9.30 वाजता एका चाळीत घडल्याचा दावा करण्यात आला आहे. जिथे आरोपी एका छोट्या खोलीत राहत असल्याचा दावा केला जातो, जिथून तो कागदी प्लेट्सचे उत्पादन करत होता. ज्याच्या आजूबाजूला लोक राहतात. त्यामुळे तक्रारदाराने जवळपास दोन महिने शेजारी किंवा तिच्या ओळखीच्या व्यक्तींकडे ही घटना कथन न केल्याने फिर्यादीच्या कथेबद्दल शंका निर्माण होते. त्यामुळे अर्जदार जामिनावर सुटण्यास पात्र आहे.” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठाने 28 ऑक्टोबर रोजी आलोक कुमार बिंद यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना यासंबंधी आदेश दिला आहे. आरोपीच्या वतीने वकील हीना मिस्त्री यांनी, तक्रारदार महिलेने राग आणि सूडबुद्धीने एफआयआर दाखल केला असा युक्तिवाद केला . तो न्यायालयाने ग्राह्य धरला आहे तसेच अर्जदाराला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पुरावे नाहीत आणि त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिला आरोपी आलोक कुमार बिंद यांचा सतत छळ करत होती आणि ब्लॅकमेल करत होती. बलात्काराच्या कथित घटनेनंतर 70 दिवसांच्या विलंबानंतर एफआयआर नोंदवण्यात आला होता त्यामुळे देखील महिलेचे आरोप शंका घेण्यास पात्र आहेत, ‘ असे निरीक्षण नोंदवले आहे .


Spread the love