प्रियकराने नकार देताच तब्बल सहा जणींनी एकाच वेळी घेतले विष , कुठे घडलाय प्रकार ?

Spread the love

प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीला मोठा धक्का बसला मात्र नकार पचवता न आल्यामुळे फक्त प्रेयसीच नाही तर तिच्या मैत्रिणींनीही टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. प्रेयसीसह सहा जीवश्च-कंठश्च मैत्रिणींनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना बिहार येथील औरंगाबादमधील कासमा भागात उघडकीस आली असून त्यात प्रेयसीसह तिघी जणींचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित तीन मैत्रिणींची तब्येत गंभीर आहे.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीला तिच्या भावाचा मेहुणा म्हणजेच वहिनीचा भाऊ आवडत होता. त्याला प्रपोज करण्यासाठी ती आपल्या पाच मैत्रिणींना सोबत घेऊन गेली आणि मैत्रिणींसमोरच तिने त्याला प्रोपोज केले आणि आपल्याशी लग्न करण्याचा प्रस्तावही तिने तरुणासमोर मांडला मात्र प्रियकराने मात्र तरुणीशी लग्न करण्यास साफ नकार दिला आणि तो निघून गेला.

त्याने दिलेला नकार हा तरुणीला चांगलाच जिव्हारी लागला आणि हिरमुसलेल्या सहा जणी गावी आल्या. नाराज झालेल्या प्रेयसीने आधी विष प्यायले आणि तिने केलेला हा प्रकार पाहून उर्वरित पाच जणींनीही तिची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि एका मागून एक पाचही मैत्रिणींनी विषप्राशन केले. तब्बल सहा जणींनी विष घेतल्याचे समोर येताच गावकऱ्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले मात्र त्यापैकी तिघी जणींनी अखेरचा श्वास घेतला होता.

गंभीर अवस्थेत असलेल्या इतर तिघींना लगेचच मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या नातेवाईकांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे. पोलिसांनी तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरु आहे. सीओ अवधेश कुमार सिंह, ठाणाध्यक्ष राजगृह प्रसाद घटनास्थळी पोहोचले असून सदर प्रकरणाचा तपास सुरु आहे.


Spread the love