महाराष्ट्रात औरंगाबाद इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका विवाहितेने चक्क तीन वर्षाच्या मुलीसह धावत्या ट्रेनमधून स्वतः उडी आत्महत्या केली असून शुक्रवारी हा प्रकार घडलेला आहे .पूनम गणेश विसपुते (वय २४) तर शांभवी विसपुते ( वय ०३ ) असे माय-लेकीचं नाव आहे. उडी मारण्यापूर्वी महिलेने भावाला, पतीला पाठवलेल्या मेसेजमध्ये ‘सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका,’ असे म्हटले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पूनमचे २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशसोबत लग्न झाले होते. गणेश परराज्यातील एका खाजगी कंपनीत कामाला असून सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून पूनम ही माहेरी औरंगाबादला आईकडे सहा महिन्यापूर्वी आली होती. शुक्रवारी पहाटे पाच वाजता गणेश व सासरची मंडळीचर्चा करण्यासाठी औरंगाबाद इथे आले मात्र ते येण्याच्या आधीच पूनम ही तीन वर्षांच्या मुलीला घेऊन घरातून गेली त्याचवेळी तिने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली.
पूनम हिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला आणि पतीला एक मॅसेज पाठवला ज्यात तिने म्हटले आहे की, “माझ्या मरणाला मी आणि मीच जबाबदार आहे. यात माझ्या सासरच्यांची चूक नाही. माहेरच्यांची नाही. भावजी, माई (लहान बहीण) लहान आहे. तिला सांभाळून घ्या. काही चुकत असेल तर माफ करा. भय्या, तुझ्याशिवाय मम्मीला कुणी नाही. तिची काळजी घे. तुझी पण काळजी घे. माझ्यानंतर शामूला कोणी नाही म्हणून मी तिला सोबत घेऊन जाते. मावशी, आई, आजी मला माफ करा. सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका. जगण्यासाठी पैसा लागत नाही, तर आनंद लागतो. आय एम सो सॉरी फॅमिली”