महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना नाशिक शहरात समोर आलेली असून नाशिक रोड येथे ‘ तुला माझ्यापासून मूलबाळ होऊ दे ‘ असे सांगत बळजबरीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विवाहितेने प्रियकराला नकार दिला म्हणून त्या प्रियकराने तिला मारहाण करत तिच्या दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलाला अक्षरश: सिगारेटचे चटके दिल्याचा गंभीर प्रकार सात तारखेला उघडकीला आला आहे. नाशिक रोड परिसरात हा प्रकार उघडकीला आला असून पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, देवळाली गावाजवळील मालधक्का रोडवरील गुलाबवाडी येथे दीड महिन्यांपूर्वी राहण्यास आलेल्या एका विवाहितेला आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलाला शिवीगाळ आणि मारहाण करत मुलाला सिगारेटचे चटके तिच्या प्रियकराने दिल्याची घटना घडल्यानंतर विवाहित महिलेने पोलिसात दाखल होती.
तिचा प्रियकर बाबासाहेब भगवान कपाटे राहणार गुलाब वाडी यांच्या विरोधात तक्रार दिली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या पीडित विवाहितेला बळजबरीने अनैतिक शरीर संबंध ठेवण्यासाठी त्याने मारहाण केली आणि तिच्या पहिल्या दोन वर्षाच्या मुलाला सिगारेटचे चटके दिले असे पीडितेचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून संशयीत कपाटे हा आई आणि तिच्या मुलाला मारहाण करत शिवीगाळ करत असायचा. सदर बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. आरोपीच्या विरोधात मुलांच्या काळजी आणि आणि संरक्षण कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.