महाराष्ट्रात एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे उघडकीला आली असून एका पतीला बेदम मारहाण करुन आणि त्यानंतर त्याला विजेच्या खांबाला बांधून त्याचा दोरीने गळा आवळण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. मोझरी येथील संतोषी माता नगर येथे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली असून सुनील वंजारी ( वय ३८ राहणार पांढरी तालुका अंजनगाव सुर्जी ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे तर या प्रकरणी त्याची पत्नी माधुरी सुनील वंजारी ( वय ३० ) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिने या खुनाची कबुली दिली आहे
उपलब्ध माहितीनुसार, मोझरी येथील महादेव राव साठवणे यांच्या मुलीचा अर्थात माधुरीचा विवाह सुनील वंजारी यांच्यासोबत 12 वर्षांपूर्वी झाला होता मात्र सुरुवातीपासून त्यांचे कधी पटलेच नाही. त्यामुळे माधुरी चार महिन्यांपासून आपल्या दोन मुलांसह मोझरी येथे आईकडे राहायला गेली होती आणि आणि तिथे एमआयडीसी मध्ये एका कंपनीत कामाला जात होती मात्र तिचा पती गेल्या काही दिवसांपासून मोझरी इथे राहत होता आणि तो तेथील एका धाब्यावर काम देखील करत असायचा
मंगळवारी दुपारी सुनील वंजारी हा मोझरी येथील सासरी पोहोचला आणि आणि त्यानंतर त्याने पत्नीसोबत भांडायला सुरू केले बराच वेळ त्यांच्यासोबत यांच्यामध्ये वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. सुनीलने दारू पिलेली असल्याने तो जागीच खाली कोसळला त्यानंतर पत्नीने त्याचे हात पाय दोराने बांधून त्याला विजेच्या खांबाला बांधून ठेवले आणि त्यानंतर चक्क गळा आवळून त्याचा खून केला अशी कबुली तिने दिली आहे.
आईने खून करून वडिलांना मारून टाकल्यामुळे या दाम्पत्याची दोन अल्पवयीन भावंडे अनाथ झालेली असून आरोपी माधुरी वंजारी हिला अटक करण्यात आलेली आहे. तिवसा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचत पंचनामा केला आणि आता पुढील तपास ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश पांडे करत आहेत .