पुणे ब्रेकिंग.. ‘ म्हणून ‘ व्यावसायिकाने आरटीजीएस केले होते मात्र त्यानंतर..

Spread the love

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात व्यवसायिकांच्या फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीला येत आहेत अशीच एक घटना उघडकीला आली असून फॅक्टरी मधून तुम्हाला कमी दराने स्टील पुरवतो असा बहाणा करत एका व्यापाऱ्याला तब्बल 12 लाख रुपयांना दोन सायबर चोरट्यांनी चुना लावलेला आहे. या दोघांनाही पोलिसांनी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत.

इरफान उर्फ ईशान अब्दुल रहमान शेख ( वय ३८ राहणार रमजान गल्ली भगत सिंह नगर गोरेगाव पूर्व मुंबई ) आणि हितेश नंदकुमार मिस्त्री ( वय पंचेचाळीस राहणार भाईंदर पूर्व ठाणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इरफान हा स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले जात असताना पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

फिर्यादी यांना मंडप स्ट्रक्चर साहित्यासाठी आवश्यकता असल्याने त्यांनी स्टील खरेदीसाठी मार्केटिंग इंडिया मार्ट इथे चौकशीसाठी एक पोस्ट टाकली होती त्यावेळी या सायबर चोरट्याने तुम्हाला कमी दरात स्टील करून देतो असे सांगून कोटेशन पाठवले त्यानंतर त्यांच्याकडून आदिनाथ मेटल या नावाने असलेल्या बँकेच्या खात्यावर बारा लाख रुपये देखील स्वीकारले मात्र स्टील न मिळाल्याने चौकशी केली असता ते खोटे विक्रेते असल्याचे आढळून आले.

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासणी केली असता आरोपी मुंबईत राहत असल्याचे समोर आले त्यानंतर मुंबईला शोध घेतल्यानंतरही आरोपी पळून गेले मात्र त्यांना नंतर जेरबंद करण्यात आले. आरोपींच्या घराची झडती घेतल्यानंतर आदिनाथ मेटल याचसोबत पद्धतीने इतरही वेगवेगळ्या फर्मची खोटी नोंदणी, वेगवेगळ्या कंपनीचे व्हिजीटींग कार्ड, सिम कार्ड, शिक्के, ट्रान्सपोर्ट चलने आणि नोटरी कागदपत्रे मिळाली. त्याचा साथीदार असलेला हितेश मिस्त्री यांच्या पत्नीच्या खात्यात शेख यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर केल्याचे देखील आढळून आले तर त्यांचा तिसरा साथीदार रोनक मेहता ( वय 37 राहणार मुंबई ) याच्या बद्दल देखील माहिती मिळाली असून त्याला खुलासासाठी नोटीस देण्यात आलेली आहे.

सदर टोळीने बऱ्याच वर्षापासून ऑनलाइन फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीएस हाके, पोलीस उपनिरीक्षक डफळ आदींच्या पथकाने ही कामगिरी कामगिरी केली आहे.


Spread the love