101% तेच जबाबदार म्हणून आत्महत्या केली तरीही पोलिसांना आरोपी सापडेनात

Spread the love

सहा एप्रिल रोजी बीड शहरात पालवन चौक भागात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर सुसाईड नोट वरून एका प्राध्यापकासह आणखी एक जणावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला होता मात्र त्यातील आरोपी सध्या फरार झालेले आहेत.

राहुल ईश्वर वाघमारे ( वय 51 ) हे शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. सुसाईड नोट लिहून त्यांनी सहा एप्रिल रोजी स्वतःच्या घरी आत्महत्या केली. तीन पानांच्या सुसाईड नोटमध्ये बाळासाहेब लाखे आणि मुन्ना करांडे या दोन जणांची नावे लिहत त्यांनी आपल्या आत्महत्येसाठी हे दोघे 101% जबाबदार असल्याचे म्हटले होते.

संशयित आरोपी हे वाघमारे यांना सातत्याने मानसिक त्रास देत होते असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. प्रीती राहुल वाघमारे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात बाळासाहेब लाखे आणि मुन्ना करांडे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love