फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार काय शक्कल लढवेल याचा नेम राहिलेला नाही अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आलेली असून कुरियर देण्याच्या नावाखाली प्राजक्ता केरकर ( राहणार लोकमान्य नगर ठाणे ) यांची तब्बल 88 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आलेली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
प्राजक्ता यांना चार मार्च दोन हजार बावीस रोजी दुपारी 1 च्या सुमारास एक कुरियर आले असल्याचा फोन आला. त्याची डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही पाच रुपये भरा असे सांगितल्यानंतर तुम्हाला तुमचे कुरियर मिळेल असे म्हणत संशयित आणि त्यांना एक लिंक पाठवली आणि त्यावर पाच रुपये पाठवा असे तो म्हणाला.
नेहमी ऑनलाईन शॉपिंग करत असल्याने आपलच कुठलतरी शॉपिंगचेच पार्सल आले आहे असा प्राजक्ता यांचा समज झाला आणि त्यांनी त्या लिंक वर पाच रुपये पाठवून एटीएमचा पिन समाविष्ट केला. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास त्यांना बँक खात्यातून तब्बल 87 हजार रुपये गायब झाल्याचा मेसेज आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या समोर आले.
प्राजक्ता यांनी त्या नंबरवर वारंवार संपर्क साधून त्या भामट्याने त्यांना प्रसाद प्रतिसाद दिला नाही म्हणून अखेर त्यांनी सात एप्रिल २०२२ ला वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सदाशिव कदम हे या प्रकरणी तपास करत आहेत.