फसवणूक करण्यासाठी चोर काय शक्कल लढवतील याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून चार चाकी गाडी बाहेर दहा रुपयांची नोट टाकून गाडीतील रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एकूण पावणेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मुलुंड पश्चिम येथे घडलेली आहे. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
पवई येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी अमी लखानी या आई-वडिलां त्यासोबत आलेल्या असताना मुलुंड पश्चिम येथे दुकानाजवळ खरेदीसाठी लखानी कुटुंबीय थांबले होते त्यावेळी त्यांना गाडी जवळ दहा रुपयांची नोट दिसली आणि त्यांनी ती उचलून आईला तुझ्या परत मधून पैसे पडत आहेत का ? असे विचारले त्यावेळी आईने सांगितले की ‘ त्यांची पर्स गाडीतच आहे त्यानंतर अमी यांनी गाडीत पाहिले असता त्यांना पर्स आढळून आली नाही आणि याच काळात पर्स लांबवली ‘, असे अमी यांचे म्हणणे आहे.