सरकारी नोकरदार पतीला ‘ म्हणून ‘ दिला घटस्फोट अन प्रियकर म्हणतोय की ? , पुण्यातील प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात विवाहबाह्य संबंधातून अनेक प्रकरणे पुढे वेगळेच वळण घेतात अशीच एक घटना पुणे शहरानजीक पिंपरी इथे उघडकीला आली असून सरकारी नोकरी असलेला पती आणि दोन मुले असलेली महिला एका इंजीनियरच्या प्रेमात पडली. त्याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याच्यासोबत घरोबा करण्यासाठी तिने चक्क पतीला देखील घटस्फोट दिला. घटस्फोट देतेवेळी आमच्या वयामध्ये पंधरा वर्षाचे अंतर आहे असे तिने कारण पुढे केले मात्र ज्याच्यासाठी घटस्फोट दिला तो इंजिनिअर देखील ऐनवेळेस लग्नाला नकार देऊ लागला त्यामुळे तिने त्याच्या विरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार विविध महिलेचे वय सत्तावीस वर्ष असून हिने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुणाल शिवाजी निकम ( वय 27 राहणार नवीन घरकुल चिखली ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने पीडित महिलेसोबत 2019 पासून ते 2022 पर्यंत पीडित महिलेच्या घरी तसेच दिघी येथे तिला वेळोवेळी घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

पीडित महिला देखील इतकी त्याच्या प्रेमात पडली की तिने पती आणि स्वतः यात पंधरा वर्षाचे अंतर असल्याचे कारण पुढे करत पतीपासून घटस्फोट घेतला मात्र त्यानंतर या इंजिनियरने तिला लग्नाला नकार दिला अखेर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कुणाल निकम याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तर पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर पुढील तपास करत आहेत.

कुणाल निकम हा मेकॅनिकल इंजिनिअर असून सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करतो. कामाच्या ठिकाणी त्याची पीडित महिलेसोबत ओळख झाली होती. पीडित महिला ही दहावी शिकलेली असून ‘ तू मला खूप आवडतेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू तुझ्या पतीपासून घटस्फोट घे मी तुझ्या सोबत लग्न करीन आणि तुला सांभाळीन ‘ असे सांगत त्याने पीडित महिलेला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्या घरी तसेच दिघी इथे तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतर लग्नाला नकार दिल्यावर पीडित महिलेला फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने पोलिसात धाव घेतली.


Spread the love