महाराष्ट्रात एक वेगळीच घटना नागपूर येथे समोर आलेली असून एन डी ए परीक्षा देण्यासाठी आलेल्या आणि रेल्वे स्थानकावर झोपलेल्या एका उमेदवाराचा मोबाईल अज्ञात आरोपीने पळवला त्यानंतर त्या मोबाईलवर फोन केलेला असताना चोरट्यांने ‘ आता मी फोन चोरलेला आहे तुझा फोन परत देतो पण तू मला ₹ 2000 फोन पे कर आणि फोन पे चा पासपोर्ट सांग , ‘ अशी अट घातली त्याची ही अट ऐकून उमेदवारांसह पोलीस देखील चक्रावून गेले
शरद वानखेडे असे मोबाईल चोरी गेलेल्या युवकाचे नाव असून त्याचे वय 17 वर्षे असून तो वाशिम येथून एनडीएची परीक्षा देण्यासाठी 9 एप्रिलला नागपूर येथे आला होता. रविवारी 10 एप्रिलला परीक्षा असल्यामुळे आणि नागपूर येथे राहण्याची सोय नसल्यामुळे तो त्याच्या मित्रांसोबत रेल्वे स्थानकावर झोपी गेला.
त्याला गाढ झोप लागल्याची पाहून परिसरातील एका भामट्याने त्याचा 13 हजार रुपये किमतीचा मोबाईल पळवला. त्यानंतर या विद्यार्थ्याने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून चोरी गेलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवली आणि त्या नंबरवर कॉल केले असताना चोरट्यांने फोन वरून ‘ मला दोन हजार रुपये फोन पे कर आणि फोन पे चा पासवर्ड सांग , ‘असे म्हटल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले .