महाराष्ट्रात एक वेगळीच घटना मुंबई येथे समोर आलेली असून पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने महिला अधिकाऱ्याचा पाठलाग करत त्यांना अश्लील संदेश पाठवत असल्याचे समोर आले आहे. खार पोलिसांनी पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
महिला पोलीस अधिकार्याने दिलेल्या तक्रारीनुसार शिपाई असलेला हा आरोपी कार्यरत पोलीस महिला अधिकाऱ्याला व्हाट्सअपवर हेतूपुरस्पर संदेश पाठवत होता तसेच त्यांचा पाठलाग देखील करत होता असे देखील त्यांचे म्हणणे आहे.
आठ एप्रिल रोजी आरोपी शिपायाने महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर रात्री बाराच्या सुमारास प्रेमाचा संदेश पाठवला होता त्यानंतर त्याच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी खार पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला अधिक तपास सुरू केला आहे.