पुणे हादरलं..पत्नीच्या आत्महत्येनंतर तिसऱ्याच दिवशी पतीनेही घेतला जगाचा निरोप

Spread the love

महाराष्ट्रात पुणे इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून नवविवाहीत युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर अवघ्या तीनच दिवसात तिच्या विरहाने तिच्या पतीने देखील आत्महत्या करण्याची घटना घडलेली आहे. डांगे चौक इथे हा प्रकार घडलेला असून तिचा विरह सहन झाला नसल्याने तिच्या पतीनेही बुधवारी गणेशनगर, डांगे चौक येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अक्षय अंबिलवादे आणि अश्विनी जगताप-अंबिलवादे अशी त्यांची नावे असून हे नवविवाहित दांपत्य मूळचे डांगे चौक येथे राहणारे होते. अक्षय आणि अश्विनी या दोघांनीही खिंवसरा पाटील या मराठी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांच्या मध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. विवाह करण्यासाठी त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन 29 नोव्हेंबर 2021 रोजी थाटात प्रेमविवाह देखील केला होता.

विवाहित असलेला अक्षय चिंचवड येथील एका सराफाच्या दुकानात नोकरी करत होता. नोकरी करत असल्यामुळे ती दोघंही चिंचवड येथे दोघंही राहत होते. मात्र विवाह होऊन काही दिवस झालेले असतानाच अश्विनीने अचानकपणे रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनीच्या आत्महत्येनंतर अक्षयला जबर मानसिक धक्का बसला होता.

अश्विनी हिच्यावर अंत्यसंस्कार केले गेल्यानंतर अक्षयला त्याच्या आई वडिलांनी आपल्या घरी डांगे चौक इथे आणले होते. अक्षयला मानसिक धक्का बसलेला आहे हे त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या मित्रानांही माहिती होते त्यामुळे अक्षयला कुणीही सोडून राहत नव्हते. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न सगळेच जण करत होते मात्र बुधवारी सकाळी मित्र अंघोळीसाठी निघून गेल्यानंतर तेवढ्याच कालावधीत अक्षयने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


Spread the love