महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून युवकासोबत आलेल्या युवतीची साथ सोडत तिला आपल्या सोबत ठेवण्यास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यात मुलगीचा निंबीपाडा येथे ही घटना घडली असून या युवकाच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
प्रियंका पाडवी ( वय 21 तालुका अक्कलकुवा ) असे मयत व्यक्तीचे नाव असून अनिल वसावे ( तालुका अक्कलकुवा ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.
अनिल याने प्रियंका हिला आपल्या सोबत घरी नेत तिला आपल्या सोबत ठेवेल असे सांगितले म्हणून ती घर सोडून त्याच्यासोबत निघून गेली मात्र काही कालावधीनंतर अनिल याने या युवतीला नकार देत सोबत राहू देण्यास नकार दिला त्यामुळेही तरुणी नैराश्यात गेली. ज्याच्यावर भरोसा ठेवला आणि आपलं घरदार सोडलं तोच आपल्याला दूर लोटत असल्याची भूमिका तिच्या मनात निर्माण झाली आणि तिने चिंबीपाडा शिवारातील एका शेतातील झाडाला ओढणीने गळफास घेतला
सदर प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली आणि पोलिसांनी अनिल वसावे या तरुणाच्या विरोधात युवतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र वाघ करत आहे.