पोलीस स्टेशनमध्येच महिलेने घेतला कायदा हातात , त्यानंतर मात्र ..

Spread the love

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून कायदा हातात घेत पोलिसांवर देखील दादागिरी पडण्याचे प्रकार दुर्दैवाने वाढलेले पाहायला मिळत आहेत अशीच एक घटना धुळे शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या एका महिलेने केली असून मंगळवारी दुपारी ही घटना घडली आणि त्यानंतर धिंगाणा घालणाऱ्या या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या.

रामचंद्र नगर येथे राहणारा महेंद्र जगताप हा सातत्याने त्याच्या पत्नीला मारहाण करत असायचा असाच त्याचा एक मारहाणीचा व्हिडिओ चक्क सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर त्याची पत्नी मीना हिने महेंद्र जगताप आणि त्याची बहीण हेमलता पद्माकर शिंपी ( वय 35 राहणार दादू सिंग कॉलनी शिरपूर ) यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिसात तक्रार दिली.

सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी हेमलता शिंपी मंगळवारी आझाद नगर पोलिस ठाण्यात आली आणि पोलिस निरीक्षक आनंद कोकरे हे चौकशी करत असताना मोठमोठ्या आवाजात उलटसुलट बोलायला तिने सुरू केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक कोकरे यांनी हेमलता हिला दालनाबाहेर घेऊन जाण्यास सांगितले त्यावेळी तिने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खलिदा सय्यद यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ ओढली. खलिदा सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 353 427 294 323 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून हेमलता हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण ?

महेंद्र जगताप हा त्याची पत्नी मीना हिला मारहाण करत होता त्यावेळी त्याच्या दोन्ही मुली मदतीसाठी धावत होत्या मात्र त्यानंतर त्यांची ताकद कमी पडू लागली म्हणून हतबल झालेल्या या मुलींनी या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करून मदतीसाठी हाक दिली होती. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महेंद्र जगताप याच्या घरी धाव घेतली आणि मीना हीला मदत केली त्यानंतर पीडित महिलेने पती महेंद्र आणि त्याची बहीण हेमलता यांच्या विरोधात तक्रार दिली आणि पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले असता हेमलता हिने पोलीस स्टेशनमध्ये चांगलाच राडा केला.


Spread the love