फसवणुकीसाठी गुन्हेगार काय शक्कल लढवतील याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात समोर आलेली असून किराणा सामान भरण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेला दोन चोरट्यांनी देवीला तुमची ओटी भरायची आहे असे सांगून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल आणि पाच हजार रुपये रोख असा ऐवज चोरटयांनी हातचलाखीने काढून घेतलेला आहे.
हडपसर येथील ससाने नगर येथे राहणाऱ्या 70 वर्षे ज्येष्ठ महिलेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे ससाने नगर येथील बालाजी ट्रेडर्स नावाच्या दुकानासमोर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या किराणा सामान भरण्यासाठी बालाजी ट्रेडर्स या दुकानात गेल्या होत्या. त्या वेळी दोन जण तिथे आले आणि त्यापैकी एकाने त्यांना देवी आईला तुमची ओटी भरायची आहे अशी बतावणी केली आणि आणि त्यांना भुरळ पाडून गळ्यातील 45 हजार रुपयांचे मंगळसूत्र काढण्यास सांगितले आणि त्यांनी मंगळसूत्र काढले. त्यावेळी दुसऱ्या चोरट्याने हातचलाखी करून हा ऐवज पसार केला त्यानंतर पीडित महिलेला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि प्रकरण पोलिसात पोहोचले असून पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.