पुण्यातील गाजलेल्या ‘ त्या ‘ प्रकरणात तब्बल साडेपाच वर्षांनी आईला जामीन

Spread the love

पुणे शहरानजीक काही वर्षांपूर्वी एक धक्कादायक घटना उघडकीला आली होती. मुलाच्या खुनाचा आरोप असलेल्या आईला उच्च न्यायालयाने तब्बल साडेपाच वर्षांनंतर जामीन मंजूर केलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी हा आदेश दिलेला आहे.

काय आहे प्रकरण ?

कौटुंबिक वादाच्या कारणातून आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला विषारी औषध पाजून त्याच्या खून केल्याची घटना तळवडे येथे दोन ऑगस्ट 2016 रोजी घडलेली होती. सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आणि या मुलाची आई स्वाती हिच्या विरोधात तिचे दीर असलेले श्रीकांत माळवदकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

घटनेच्या दिवशी स्वाती हिचा दीर विक्रम याने स्वाती यांना फोन केला मात्र स्वाती हिने फोन उचलला नाही म्हणून विक्रम घरी गेले असता त्यांना त्यांचा पुतण्या निशीगंध हा अंथरुणात झोपलेला होता तर त्यांची वहिनी स्वाती ही घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. त्यांनी पंख्याला साडी बांधली होती आणि आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र फिर्यादी यांनी तात्काळ त्यांना दवाखान्यात दाखल केले त्यामुळे निशीगंध याचा मृत्यू झाला तर स्वातीवर उपचार करून तिला डिस्चार्ज देण्यात आला.

तब्बल पाच वर्ष सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा 18 नोव्हेंबर 2019 रोजी सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात स्वाती माळवदकर हिने एडवोकेट अनिकेत निकम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील आणि जामीनासाठी अर्ज केला होता त्यानंतर घटना घडल्यानंतर तब्बल साडेपाच वर्षांनी तिचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

न्यायालयाने जामीन मंजूर करताना सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याने स्वाती माळवतकर यांनी टोकाचे पाऊल उचलले होते मात्र स्वतःच्या मुलाला मारण्याचा त्यांचा कोणताही इरादा दिसून येत नाही. आरोपीला ठोठावलेली शिक्षा ही परिस्थितीजन्य पुराव्यावर आहे आणि पुराव्यांची साखळी अपूर्ण असल्यामुळे स्वाती माळवदकर हिला दोषी ठरवता येणार नाही असा युक्तिवाद एडवोकेट अनिकेत कदम यांनी केला होता मात्र सरकारी वकिलांनी आरोपी माळवदकर हिच्या जामिनाला विरोध केला आणि त्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून स्वाती माळवदकर हिला जामीन मंजूर करण्यात आला.


Spread the love