देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने गोड बोलत सदर महिलेला आपल्या जाळ्यात ओढले आणि चक्क 10 लाख रुपयांना गंडा घातला. परदेशातून तुमच्यासाठी पाठवलेले गिफ्ट सोडवून घेण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेची तब्बल सव्वा दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चंदननगर परिसरात राहणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेशी आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्याने वेळोवेळी तिच्या संपर्कात राहत तिचा विश्वास संपादन केला. आपण परदेशात पायलट म्हणून कामाला आहे असे सांगत त्याने ‘ मी फक्त तुमच्यासाठी ‘ म्हणून गिफ्ट पाठवले आहे आणि ते गिफ्ट सोडवून घेण्यासाठी म्हणून तब्बल सव्वा दहा लाख रुपयांची फसवणूक केली. पैसे जाऊनही कोणतेच गिफ्ट भेटले नाही म्हणून फसवल्याची जाणीव झाल्याने या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
2 ते 29 एप्रिल 2021 दरम्यान ही घटना घडली होती. आरोपीने आपण परदेशात पायलट असून तुमच्यासाठी मी भेटवस्तू पाठवत असल्याचं सांगितलं होत. मात्र ते सोडवण्यासाठी म्हणून वेळोवेळी पैसे उकळले. आपली फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.