दुसऱ्या दिवशी ती लॉजवर येणार होती मात्र त्याच्या आतच ‘ वारं फिरलं ‘ अन ..

Spread the love

देशात आजकाल पैसे कमवण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही. मॅरेज रॅकेटपासून तर हनी ट्रॅप पर्यंत अनेक प्रकार गुन्हेगार करत असतात अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील वाई येथे समोर आलेले आहे. पतसंस्थेतील एका तरुणाला आणि हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवल्याचे समोर आल्यानंतर आणखी दोन जणांना सेम त्याच पद्धतीने एका दाम्पत्याने अर्थात बंटीबबलीने ‘ पटवल्याची ‘ घटना पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दोन्ही पीडित पुरुष हे वाई तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, पुनम हेमंत मोरे ( वय 30 ) आणि हेमंत विजय मोरे ( सध्या राहणार कुडाळ तालुका जावळी ) असे अटक केलेल्या बंटी बबलीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाई तालुक्यातील एका पतसंस्थेत तीस वर्षीय युवक कामाला आहे. काही महिन्यापूर्वी पुनम मोरे हिने या युवकाला बँकेत काम मिळेल काय ? असे म्हणून त्याचा मोबाईल नंबर घेतला होता त्यानंतर तिने त्याच्या सोबत व्हाट्सअप वर चॅटिंग सुरू केले. त्याला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर एकदा भेटायचे आहे असे म्हणत तिने त्याला लॉजवर बोलवले.

दुसऱ्या दिवशी लॉजवर भेटायचे असताना त्याच्या आधीच हेमंत मोरे याने या पीडित तरुणाला माझ्या बायकोला लॉजवर का बोलवले ? असा जाब विचारत व्हाट्सअपवरील तुझे अश्लील मेसेज तुझ्या घरच्यांना दाखवतो आणि तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढतो अशी धमकी दिली होती. पिडीत तरुणाने यानंतर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली त्यावेळी हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समोर आले.


Spread the love