महाराष्ट्र हादरला..मुलीच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आईने घेतला गळफास

Spread the love

महाराष्ट्रात एक हृदयद्रावक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलेली असून वरोरा येथे मुलगी 1 वर्षांची झाली आणि त्यानंतर तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना उघडकीला आली असून त्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, करिष्मा पंधराम ( वय पंचवीस वर्ष ) असे महिलेचे नाव असून वरोरा शहरात शिवाजी प्रभागात त्या राहत होत्या. पती राहुल आणि पत्नी करिश्मा आणि त्यांची एक वर्षाची मुलगी असे त्यांचे कुटुंब होते. त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस 16 एप्रिल रोजी होता.

वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्यानंतर जवळच्या आप्तेष्टांना बोलवण्यात आले आणि वरोरा शहरातील एका लॉनमध्ये एकात मोठ्या थाटामाटात हा वाढदिवस साजरा झाला. घरात सर्वत्र आनंद असताना वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी 17 एप्रिल रोजी संध्याकाळी करिश्माने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्या मंडळींनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले मात्र अखेर तिचा मृत्यू झाला.

सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना करिश्माने हे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकलेले नाही. मुलीच्या वाढदिवसाला उपस्थित असलेल्या आप्तेष्टांना दुसर्‍या दिवशी मोठ्या जड अंतकरणाने करिश्माच्या अंत्यसंस्काराला उपस्थित रहावे लागले त्यामुळे त्यांचे देखील अश्रू अनावर झाले होते. एक वर्षाची चिमुरडी यामुळे पोरकी झालेली असून घटनेचा तपास वरोरा पोलिस करत आहेत


Spread the love