देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवली तर ?

Spread the love

देशाची खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था आणि त्यात अवाढव्य पद्धतीने दरवाढ करून जनतेची लूट मोदी सरकारने चालवलेली आहे त्यामुळे देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवली तर विशेष वाटायला नको. एखाद्या कुटुंबाची काही मान मर्यादा असते मात्र मोदी यांनी देशाच्या अनेक संस्था विकून एक प्रकारे मनी मंगळसूत्र विकून त्यांच्यावर देश चालवण्याची वेळ आणलेली आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

कराड येथे सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, ‘ विरोधकांना घटना लोकशाही मान्य नाही त्यामुळे लोकशाही संपवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून त्यांना स्वातंत्र्यपूर्वीची समाजव्यवस्था आणायची आहे. सत्तेसाठी त्यांनी शिवसेनेला फसवले त्यामुळे राज्याला जातीय वादापासून रोखण्यासाठी महाविकासआघाडी निर्माण झालेली आहे . ‘


Spread the love