धक्कादायक..विवाहित महिला डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीला आली असून काही महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका विवाहित महिला डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आलेला आहे. अमरावती येथील ही घटना असून राधानगरात २७ वर्षीय डॉक्टर असलेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. प्रियंका कातकीडे असं या मृतक तरुणी डॉक्टरचं नाव असून तिने सहा महिन्यांपूर्वी प्रकाश दिवान नावाच्या तरुणासोबत मंदिरात लग्न केलं होत मात्र बुधवारी पहाटे तिचा मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, प्रियंका यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे तसेच प्रकाश दिवान हे वैद्यकीय अधिकारी असल्याने अमरावतीत तिच्यावर शवविच्छेदन केल्यास तिच्या वैद्यकीय अहवालात छेडछाड होवू शकते म्हणून अकोल्यात शवविच्छेदन करण्यात यावं, अशी मागणी कुटुंबियांनी धरून ठेवल्याने अकोल्यात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आलेले आहे .

प्रियंका रमेश कातकीड़े ( वय २७, राहणार यशोदा नगर, जि.अमरावती ) हिने वैद्यकीय परीक्षा दिल्यानंतर निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होती त्यावेळी विवाहित असलेले आणि अमरावती येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी म्हणून पंकज शेषराव दिवान (वय ४१, राहणार राधा नगर, जि. अमरावती.) यांच्याशी तिची मैत्री झाली आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाले. प्रियंका हिने पंकज दिवाने यांच्याबरोबर ८ महिन्यापूर्वी म्हणजेच २४ ऑगस्ट २०२१ रोजी मंदिरात लग्न केले आणि ते बरोबर राहू लागले.

२० एप्रिल रोजी पहाटे प्रियंकाच्या कुटुंबियांनी तिला कॉल केला असता संपर्क झाला नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी तिच्या घराकड़े धाव घेतली मात्र ती मृत अवस्थेत आढळून आली. गाडगेनगर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि घटनेचा पंचनामा केला. तिच्या कुटुंबियांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला असून तपास सुरु असल्याचे समजते. प्रकाश याचे आधी लग्न झालेले असताना आणि अगोदर पहिली पत्नी असताना त्याने दुसरे लग्न केले होते त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Spread the love