औरंगाबाद हादरलं..मारहाणीत अक्षरश: केला हाडांचा चुरा, युवकाचा मृत्यू

Spread the love

महाराष्ट्र अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना महाराष्ट्रात अशीच एक घटना औरंगाबाद येथे उघडकीला आली असून लाईट फोकस चोरल्याच्या संशयावरून एका वाचमन असलेल्या तरुणाचे हातपाय बांधून आठ जणांनी त्याला अमानुषपणे मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडलेली असून मृत व्यक्तीच्या शरीरातील हाडांचा चुराडा झाला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सतीश खरे आणि सागर खरात अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत तर मनोज आव्हाड ( वय 27 ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सागर खरात याने एक सभागृह भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेले होते त्यावेळी तिथे मनोज हा वॉचमन काम करत असायचा. चार दिवसांपूर्वी तिथे एका महिलेचा मोबाईल चोरीला गेलेला होता आणि दोन दिवसांपूर्वी दोन लाईट फोकस आणि वायरची देखील चोरी झाली. बुधवारी आठ आरोपी त्याच्या घरी गेले आणि कामावर जायचे आहे असे सांगून त्याला हॉलवर घेऊन आले.

चोरीची कबुली देण्यासाठी त्याला मारहाण सुरू केली आणि याच मारहाणीत लाकडी दांड्याने जोरदार फटके मारल्याने त्याच्या हाडांचा चुरा झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे .


Spread the love