प्रियकराच्या प्रेमात केल्या होत्या सगळ्या मर्यादा पार , मर्डर मिस्ट्री ‘ अशी ‘ सुटली

Spread the love

देशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आपल्या लग्न झालेल्या बॉयफ्रेन्डची ओळख स्वतःच्या नवऱ्याला तरुणीनं आपला भाऊ म्हणून करुन दिली आणि याच प्रियकराच्या मदतीनं आपल्याच नवऱ्याचा लग्नानंतरच्या 26 दिवसांत काटा काढला. छतरपूरच्या दौरीया गावात ही घटना उघडकीस आली होती. रुबिना असे या विवाहितेचे नाव असून तिचा प्रियकर जितेंद्र याच्या मदतीने तिने आपला पती जावेद याचा काटा काढला. जितेंद्र आणि रुबिना एकमेकांच्या प्रेमात इतके बुडालेले होते कि विवाहित असलेला जितेंद्र याने तिच्या प्रेमात पुढील मागील काहीच विचार केला नाही.

मध्य प्रदेशतच्या छरपूर जिल्ह्यातमध्ये 30 सप्टेंबर 2017 रोजी हा प्रकार घडलेला होता. जावेदशी लग्न झाल्यानंतर रुबिनानं आपल्या प्रियकरांची ओळख पती जावेदशी करुन दिली आणि हा माझा भाऊ आहे, असं सांगून जावेद याला अंधारात ठेवले. बॉयफ्रेन्डसोबत आयुष्य घालवण्यासाठी रुबिनानं जितेंद्रच्या मदतीनं जावेदचा काटा काढला त्यावेळी तिला जितेंद्र याचा विवाह झाला असल्याची देखील कल्पना होती.

जितेंद्र आणि रुबिना यांच्यात धर्म वेगळा असल्याने प्रेमाला विरोध झाल्यानंतर रुबिनाचं लग्न घरातल्यानं जावेदशी लावून दिलं होत त्यानंतर जावेदशी लग्न झाल्यानंतर रुबिनानं आपला बॉयफ्रेन्ड जितेंद्र याची जावेद याच्यासोबत चक्क भाऊ म्हणून ओळख करून दिली होती आणि त्यातून त्यांच्यात मैत्री देखील झाली. जितेंद्रच्या सांगण्यावरुन एकदा जावेदला एका ठिकाणी भेटायला बोलावलं आणि सगळे मिळून भरपूर दारू पिले.

दारुच्या नशेत असलेल्या जावेदला जितेंद्र याने छातीत गोळ्या झाडत संपवले आणि त्यानंतर जितेंद्र घटनास्थळावरुन पुन्हा दौरीया गावी निघून आला आणि दुसऱ्या दिवशी जावेदच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ पुन्हा जितेंद्र पोहोचला. पहाटे पाच वाजता त्यानं खड्डा खोदला आणि त्यानंतर त्या खड्ड्यात जावेदचा मृतदेह त्यात पुरला.

जावेद चार दिवस घरी नाही आला म्हणून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीनं रुबिना आणि जितेंद्रचे फोन रेकॉर्ड तपासले. त्यातून पोलिसांचा संशय बळावत गेला. जावेदच्या हत्येनंतर 55 दिवसांनंतर पोलिसांनी जितेंद्र याला अटक केली होती कारण तोपर्यंत जावेदचा मृतदेहच सापडलेला नव्हता अखेर जावेदला अटक झाल्यानंतर रुबिनाच या सगळ्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले.

रुबिनानं आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिलाही अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे रुबिनाचे एका दुसऱ्या गावातील मामाच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय जितेंद्रनं जावेदच्या मनात भरला होता आणि या दोघांना रंगेहाथ पकडण्यासाठी जावेदला जितेंद्रनं एका ठिकाणी बोलवलं आणि त्याचा काटा काढला तर दुसरीकडे लग्न झालेला जितेंद्रही रुबिनाच्या प्रेमापोटी आपल्या पत्नीला फसवत होता.


Spread the love