माजी शिक्षणाधिकारी चक्क तुम्हीही ? पीडिता म्हणतेय की ‘ वेळोवेळी .. ‘

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात समोर आलेली असून पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत सहा वर्ष तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत अत्याचार केल्याची घटना शहरातील गोविंद नगर परिसरात उघडकीला आली आहे. सदर प्रकरणी धुळे येथील एका माजी शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी पीडित महिला ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात काही कामानिमित्त गेली असताना तिथेच संशयित प्रवीण वसंत अहिरे ( राहणार गोविंद नगर ) यांच्यासोबत तिची ओळख झाली होती त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले त्यावेळी संशयित व्यक्ती प्रवीण अहिरे यांनी पीडित महिलेला विश्वासात घेत लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि 2016 पासून आतापर्यंत पीडित महिलेसोबत वारंवार शारीरिक अत्याचार केले असे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

अंबड पोलिसांनी संशयित व्यक्ती प्रवीण अहिरे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पीडित महिला आणि संशयित आरोपी हे मागील सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखतात असेदेखील तपासात आढळून आलेले आहे आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी हा तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.


Spread the love