.. अन अल्पवयीन मुलगी तिथून पळत सुटली , आरोपीचे वय ऐकाल तर..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात कुसुंबा येथे उघडकीला आली असून एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचाराचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केलेला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना ही घटना सांगितली आणि त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी शोध घेऊन या संशयित अल्पवयीन मुलाला पकडले असून त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कुसुंबा येथे घराबाहेर खेळत असताना सात वर्षीय बालिकेला 15 वर्षाच्या मुलाने कसले तरी आमिष दाखवले आणि संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तिला आपल्या हाती घेऊन गेला. घरात गेल्यानंतर त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मुलगी घाबरून पळत आपल्या घरी आली आणि तिने आई वडीलांना हा प्रकार सांगितला त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठत मुलाच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी त्यानंतर ही कारवाई केली आहे.


Spread the love