‘ मला संन्यास घ्यायचाय तू केवळ हळदीपुरती म्हणून आता..’, नऊ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

Spread the love

महाराष्ट्राला कौटुंबिक हिंसाचार काही नवीन राहिलेला नाही. अनेक आत्महत्या याच कारणातून झालेल्या आहेत अशीच एक दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उघडकीला आले असून अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न रंगात असलेली माहेरवाशीण विशाखा शैलेश येवले ( वय 26 राहणार चाळीसगाव ) हिने सासरच्या मानसिक छळाला कंटाळून रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सदर प्रकरणी पोलिसात तन्मय नरेंद्र वेढणे यांनी मयत विशाखा हिचा पती शैलेश येवले, सासरे रमेश येवले आणि सासू रंजना येवले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विशाखा यांचे नऊ महिन्यांपूर्वी चाळीसगाव येथील शैलेश येवले याच्यासोबत थाटामाटाने लग्न झाले होते.

लग्नानंतर काही दिवसातच शैलेश याने मला संन्यास घ्यायचा असून तुला केवळ हळद लावण्यापुरते तुझ्याशी लग्न केलेले आहे असे सांगत आता आम्हाला मोकळे करून दे असे म्हणत संगनमताने तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर या त्रासाला कंटाळून तरुणीने विवाहितेने आत्महत्या केली असे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत


Spread the love