पुणे शहर हे अनेक तरुणांचे शिक्षणाचे केंद्र बनलेले आहे मात्र अनेकदा तरुण शिकत असलेल्या संस्थेची व्यवस्थित माहिती घेत नाही आणि त्यातून त्यांची फसवणूक होते असाच एक प्रकार पुणे शहरात समोर आलेला आहे. आंतरराष्ट्रीय संस्था असल्याच्या नावाखाली फॅशन डिझाईनचे शिक्षण देणाऱ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्यावर हा प्रकार समोर आलेला असून विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी नसताना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे.
सदर प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात 70 ते 80 विद्यार्थ्यांनी येऊन तक्रार दिली असून महाराष्ट्रात परराज्यातील विद्यापीठाच्या पदवीचे शिक्षण देता येत नाही मात्र तरीही या संस्थेने अण्णामलाई विद्यापीठाचे अभ्यासक्रम पुण्यात सुरू केले आणि फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझाइनिंग आदी अभ्यासक्रमास अनेक विद्यार्थ्यांना मोठी फी घेऊन प्रवेश दिला .
युवा सेनेचे विद्यार्थी आणि पालकांच्या समवेत डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सदर प्रकार हा नियमबाह्य पद्धतीने सुरू असून विद्यार्थ्यांना शासकीय नियमांना फाटा देत अभ्यासक्रम शिकवला जात आहे त्यामुळे त्यांची फसवणूक होत आहे. विद्यापीठाचे शुल्क सुमारे 35 हजार असताना या संस्थेने तब्बल अडीच ते साडेतीन लाख रुपये शुल्क आकारले अशी सहसचिव यांनी सांगितले आहे त्यानंतर या संस्थेला शासनाची मान्यता आहे की नाही याची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.