महाराष्ट्रात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असून अशीच एक घटना बीड जिल्ह्यात माजलगाव येथे समोर आलेली आहे. केंद्र शासनाच्या पोस्ट खात्यात नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख रुपयांना गंडा घातला प्रकरणी विजय तानाजी लोखंडे ( राहणार केसापुरी कॅम्प ) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
माजलगाव शहराजवळ असलेल्या देवखेडा येथील रहिवासी राजेंद्र शेषराव मस्के यांची माजलगाव शहरातील बाजार रोडवर असलेल्या साईराज मल्टी सर्विसेस सामान विजय तानाजी लोखंडे यांच्यासोबत ओळख झाली होती या ओळखीतून लोखंडे याने राजेश मस्के यांना मी तुम्हाला केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यात नोकरीला लावतो असे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून ऑक्टोबर २०२० मध्ये दोन लाख रुपये घेतले मात्र नोकरी लागली नाही.
मस्के यांनी पैशासाठी तगादा लावला मात्र लोखंडे याने पैसे परत दिले नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत लोखंडे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच विजय लोखंडे हा फरार झालेला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास पालवे हे करत आहेत.